व्हाईटवॉशचा बदला व्हाईटवॉशने

माउंट माँगनुई: पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशचा बदला न्यूझीलंडने वनडे मालिकेत व्हाईटवॉशने दिला. तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने ५ विकेटनी विजय मिळवत मालिका ३-०ने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेले २९७ धावांचे आव्हान न्यूझीलंडने १७ चेंडू राखून पार केले. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सला सामनावीर तर रॉस टेलरला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.भारताने केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत २९६ धावा केल्या होत्या. विजयासाठी २९७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला मार्टिन गप्टिल आणि हेन्नी निकोल्स यांनी शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. गप्टिल ६६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यम्सनला चहलने २२ धावांवर बाद केले. पण तोपर्यंत न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली होती. निकोल्सने ८० धावा केल्या. त्याला शार्दुल ठाकूने बाद केले.