उल्हासनगर : देशातील काही शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेविकांनी महासभेत मांडलेला उल्हासनगरातील दारूबंदीचा प्रस्ताव सोमवारी बहुमतानी मंजूर झाल्याने, बारमालक व दारूच्या दुकानदारात खळबळ उडाली. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीकरिता पाठविण्याचे आश्वासन आयुक्तांनी महासभेत दिले. राज्य शासनाने या प्रस्तावास मंजुरी दिली तर दारुबंदी लागू करणारी ही बहुदा महाराष्ट्रातील पहिलीच महापालिका ठरेल. उल्हासनगरात डान्सबार, बार, हॉटेल, लॉजिंग- बोर्डिंग, हुक्का पार्लर आदीच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली असून अंमली पदार्थ विक्रीचा धंदा तेजीत आहे.
| दारूबंदीचा प्रस्ताव बहुमताने मंजूर