राज्यावर सध्या करोनाचे संकट असून, दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. करोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी आता शिक्षण विभागाने देखील पाऊल टाकले असून, राज्यातील पहिली ते आठवी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.या संदर्भात आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. दरम्यान बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील निर्णय घेण्यात आल्याचे वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
पहिली ते आठवीची परीक्षा रद्द