कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला जनता क! पाळण्याचे आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या सुमारे २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या एक दिवसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणार्या लोकलच्याही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंसेंजर ट्रेन २१ मार्चला रात्री ११ वाजल्यापासून २२ मार्च पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. मेल, एक्सप्रेस आणि इंटरसिटी २२ मार्चला पहाटे ४ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत बंद राहतील.
आज २४०० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द